प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित !
कल्याण, २८ मार्च (वार्ता.) – येथील पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता. हा प्रचार हिंदु राष्ट्र सेनेचे कल्याण शहर संघटक श्री. आशिष पाण्डेय यांनी येथील अधिकारी आणि पोलीस यांच्या निदर्शनास आणून रोखला; मात्र ‘या परिचारिकेवर कठोर कारवाई प्रशासनाने करावी’, अशी मागणी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात येत आहे, तर दुसर्या एका घटनेत ख्रिस्ती प्रचारक येथील पूर्व भागातील हिंदूबहुल परिसरात प्रचार करत होते. हा प्रकारही येथील हिंदुत्वनिष्ठांनी थांबवला. कल्याण येथील हिंदु धर्माभिमानी श्री. धीरज गुप्ता हे नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील एका कक्षामध्ये उपचार घेतल्यावर ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या परिचारिका मीनाक्षी अवस्थी यांनी ‘तुम्ही हिंदी आहात कि मराठी भाषिक आहात ?’, असे विचारले आणि त्यांना ‘नवा करार’ची प्रत दिली.
यावर त्यांनी ‘मी हिंदु आहे आणि मी भगवद्गीतेनुसार कृती करतो’, असे सांगून प्रत घेणे नाकारले, त्या वेळी रुग्णालयातील कक्षाच्या भिंतींवर बघितले असता ‘येशू ही प्रभू है, येशू ही भगवान है ।’ अशा आशयाचे फलक लावलेले त्यांना दिसले. या फलकांचे चित्रीकरण करण्यास मात्र परिचारिका आणि पोलीस यांनी हिंदुत्वनिष्ठांना विरोध केला. (यावरून पोलिसांचा या ख्रिस्ती प्रचाराला पाठिंबा आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय? – संपादक)
घडलेला हा प्रकार श्री. गुप्ता यांनी त्यांचे मित्र श्री. अजित चौबे यांना सांगितल्यावर हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आशिष पाण्डेय यांनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार थांबवला. यानंतर पोलिसांनी या परिचारिकेला केवळ समज देऊन सोडून दिले.
ख्रिस्ती धर्मप्रचार करणार्या शासकीय रुग्णालयातील परिचारिकेवर कारवाई करावी ! – आशिष पाण्डेय, कल्याण शहर संघटक, हिंदु राष्ट्र सेना
नेतीवली येथील महापालिकेच्या रुग्णालयात सगळ्या जाती-धर्मांचे नागरिक उपचारासाठी येत असतात. शासकीय रुग्णालय ही विशिष्ट जाती किंवा धर्म यांचा प्रसार आणि प्रचार करण्याची जागा नव्हे. येथे येणार्या हिंदु नागरिकांना ‘नवा करार’ची प्रत देऊन परिचारिकेला नेेेमका काय उद्देश साध्य करायचा होता ? वेतन शासनाकडून घ्यायचे आणि शासकीय रुग्णालयात ख्रिस्त्यांची भित्तीपत्रके लावून अन् येणार्या रुग्णांना हेरून त्यांना ‘नवा करार’ची प्रत देऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचा, हे योग्य आहे का ? यापूर्वीही ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध प्रलोभने दाखवून धर्मांतर केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी या प्रकाराची प्रशासनाने गंभीर नोंद घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.