हिंगोली येथील कोरोना संशयित आधुनिक वैद्याचा अहवाल ‘निगेटिव्ह’

हिंगोली – येथील शासकिय रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना संशयित एका आधुनिक वैद्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेला अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. अकोला येथील महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका आधुनिक वैद्याला सर्दी, खोकला, ताप येत असल्याने २७ मार्च या दिवशी रुग्णालयात भरती करून घेण्यात आले होते. पुढील १४ दिवसांपर्यंत त्यांना ‘होम क्वारंटाईन’ केले जाणार आहे. जिल्ह्यात ७ देशांतून आलेल्या १० जणांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.