सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार आकसाने वागत आहे ! – रणजित देसाई, गटनेते, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग – गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.

अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आदेश

अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !

हरभरा उत्पादनवृद्धीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी आत्मसात करावे ! – मुकुंद म्हेत्रे

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात हरभरासारख्या पिकासाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यामुळे हरभर्‍याचे उत्पन्न ३० ते ४० प्रतिशत वाढून शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असा विश्‍वास कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

गुरुकृपायोगानुसार साधना ही ज्ञानयोग-भक्तीयोग-कर्मयोग यांचा अपूर्व संगम ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

आजचा सत्संग सोहळा भावस्पर्शी होता. साधनेच्या अनुभवाचे बोल ऐकून आत्मिक आनंद मिळाला. संतांच्या संगतीत राहून अमृताचा वर्षाव झाल्यासारखे वाटले. ‘गुरुकृपेने झाले साधक गोळा । संपन्न झाला सत्संग सोहळा ॥’

कोल्हापुरात आता ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केवळ ७०० रुपयांमध्ये

खासगी प्रयोगशाळांनी कोरोनाची चाचणी आता केवळ ७०० रुपयांमध्ये करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. तिसर्‍यांदा ही दरआकारणी अल्प करण्यात आली आहे.

पुणे येथे ‘प्लाझ्मा’ बॅगच्या किमतींमध्ये तफावत !

आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतोे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी !

शिर्डी संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली घोषित !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी संस्थानने नाताळच्या निमित्ताने साई दर्शनासाठी नवी नियमावली घोषित केली आहे.

२६ डिसेंबरला शिवसेनेची सांगली-तुळजापूर १६ वी आशीर्वाद यात्रा ! – हरिदास पडळकर, शिवसेना

ही यात्रा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता सांगली येथील शिवतीर्थ, मारुति चौक येथून प्रारंभ होईल, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख निमंत्रक आणि शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.

नेर्ली (जिल्हा सांगली) येथे आढळला सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख ! – मिरज इतिहास मंडळाचे संशोधन

सांगली जिल्ह्यातील नेर्ली (तालुका कडेगाव) येथे सुमारे ७०० वर्षांपूर्वीचा वीरगळलेख आढळला आहे. मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा लेख शोधला आहे.