Congress Worker Himani Narwal Murder : रोहतक (हरियाणा) येथे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांची हत्या

सूटकेसमध्ये आढळला मृतदेह

महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल (वर्तुळात)

रोहतक (हरियाणा) – येथे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये आढळून आला आहे. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत.

रोहतकमध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बस स्थानकावर लोकांची गर्दी जमा झाली होती. येथे निळ्या रंगाची सुटकेस रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याचे दिसून आले. काही लोक तिच्या जवळ गेले; मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आले आणि त्यांनी सूटकेस उघडली, तेव्हा त्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. या युवतीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

या घटनेची माहिती रोहतकचे आमदार बी.बी. बात्रा यांना मिळाली. त्यांनी या तरुणीची ओळख पटवली आहे. बी.बी. बत्रा यांनी हिमानी नरवाल हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी, अशी मागणी केली आहे.