Ambala Court Firing : अंबाला येथील न्यायालयाच्या परिसरात गोळीबार; टोळीयुद्धाचा संशय !

घटनास्थळ

अंबाला (हरियाणा) – अंबाला शहर न्यायालयाच्या परिसरात १ मार्चला सकाळी ११ वाजता गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अन्वेषण चालू केले. घटनास्थळावरून पोलिसांनी ३ काडतुसे जप्त केली आहेत. प्राथमिक अन्वेषणात असे दिसून आले आहे की, हे प्रकरण टोळीयुद्धाशी संबंधित आहे.

पोलिसांनी घटनास्थळाभोवती लावलेल्या ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’च्या आधारे आरोपींचा शोध चालू केला आहे. स्थानिक लोकांचीही चौकशी केली जात आहे. न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !