गायींना नेणार्या ट्रकमध्ये ४ गायी मृत सापडल्या
फरीदाबाद (हरियाणा) – येथे गोरक्षक हे गायींना वाचवण्यासाठी गोतस्करांच्या एका वाहनाचा पाठलाग करत होते. या वेळी के.एम्.पी. महामार्गावर तस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते गुरांनी भरलेला एक संपूर्ण ट्रक सोडून पळून गेले. या ट्रकमध्ये ४ गायी मृतावस्थेत, तर अनेक गुरे जिवंत आढळली. त्यांना क्रौर्यतेने गाडीत चढवण्यात आले होते. या प्रकरणी गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. गायींना वाचवल्यानंतर त्यांनी त्यांना सुरक्षितपणे गोठ्यात पाठवले. तस्कर गुरांना उत्तरप्रदेशातील मथुरेहून हरियाणातील नूंह येथे घेऊन जात होते.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस गोतस्करांची माहिती काढून त्यांना कधीच का पकडत नाहीत ? प्रत्येक वेळी गोरक्षकांनाच त्यासाठी प्रयत्न का करावा लागतो ? हरियाणात भाजपचे सरकार असतांना हे अपेक्षित नाही ! |