श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !  

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून नोटीस

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस

गरीब व्यक्तीलाही अर्पण देता यावे, यासाठी श्रीराममंदिरासाठी समाजातून वर्गणी गोळा केली जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

‘सर्वधर्मसमभाव’ याचा अर्थ ‘धर्माला न मानणारे’ असा होत नाही. प्रभु श्रीराम धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रतीक आहे.

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

साप्ताहिक सनातन प्रभातच्या वितरणास पुन्हा आरंभ !

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर दळवळणबंदीमुळे साप्ताहिक सनातन प्रभात वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक

कोरोना लसीमध्ये डुकराच्या मांसाचा वापर झाल्याच्या माहितीवरून इस्लामी देशांमध्ये चिंता

कोरोनाचे लसीकरण जगातील काही देशांमध्ये चालू झाले आहे. भारतातही लवकरच ते चालू होणार आहे; मात्र मुसलमान देशांनी चिंता व्यक्त केली आहे, ‘ही लस सडलेल्या पशूंची चामडी, हाड, गुरे आणि डुक्कर यांची चरबी उकळवून बनवली जात आहे.

किल्ले प्रतापगड येथे शासकीय ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चालून आलेले अफझलखानाच्या रूपातील संकट नष्ट केले.

मेट्रो कारशेडच्या प्रश्‍नाविषयी आवश्यकता भासल्यास शरद पवार पंतप्रधानांशी चर्चा करतील ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

शरद पवार यांनी मेट्रो कारशेडविषयी ‘यामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण करायला पाहिजे’, असे मत व्यक्त केले.

मास्क आणि सामाजिक अंतर यांचे पालन न केल्याने चिलीच्या राष्ट्रपतींना अडीच लाख रुपयांचा दंड

भारतातील राजकीय नेतेही कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे सर्रास उल्लंघन उल्लंघन करत असतांना त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस कुठलेही प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !

राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्‍यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली

पणजी – पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारकांना भेट देणार्‍यांच्या संख्येवरील मर्यादा हटवली आहे.