चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

येत्या निवडणुकीत मराठा समाज काँग्रेसविरोधात भूमिका घेणार !

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस निवडणुकांमध्ये काँग्रेसला मुकावे लागेल !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

पर्यटकांच्या दायित्त्वशून्य वागण्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

‘ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीच्या आमदारांचा या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी हेतू मात्र राजकीय आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

मूलभूत सुविधांचा फार्स !

जे प्राथमिक आहे, तेच होत नाही, तर आंतरिक प्रेरणेने जनतेला काय आवश्यक आहे, ते जाणून घेऊन करणे किती दूर आहे ! ते होण्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा, जनतेप्रती प्रेम आणि पालकत्वाची भावना हवी ! तसे झाल्यास न्यायालयाला अशा गोष्टींत लक्ष घालावे लागणार नाही !

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत विमानाने शारजाहून ८५ नागरिक गोव्यात

भारतात येऊ इच्छिणार्‍या विदेशातील भारतीय प्रवाशांसाठी ५३ वे विमान गोव्यात ८५ प्रवाशांना घेऊन आले. भारत शासनाच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत हे विमान शारजाहून २६ डिसेंबरला सकाळी गोव्यात पोचले.

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थाे दासगुप्ता यांना अटक

‘टी.आर्.पी.’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे.