गोवा : अमली पदार्थ समवेत बाळगल्याच्या प्रकरणी संशयिताची न्यायालयाकडून निर्दाेष सुटका

पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !

उच्च न्यायालयाने प्रशासनाला नोटीस पाठवून बाप्तिस्मा घाटाचे अनधिकृत बांधकाम रोखण्यास भाग पाडले !

अनधिकृत बांधकाम केले जात असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? हे न्यायालयाला का सांगावे लागते ? प्रशासनाला स्वतःहून कळत नाही का ? यास उत्तरदायी असणार्‍या दायित्वशून्य अधिकार्‍यांना कारागृहात टाकले पाहिजे !

कर्नाटकमधील गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंदवल्‍या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकांना जामीन संमत

‘कर्नाटकमध्‍ये गोतस्‍करी करणार्‍या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्‍या केल्‍याचा  आरोप गोरक्षकावर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्‍या) झाल्‍याची ओरड केली.

पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरणे अपमानास्पदच; पण देशद्रोह नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

‘पंतप्रधानांना जोड्याने मारले पाहिजे’ असे अपशब्द उच्चारणे, हे केवळ अपमानास्पदच नाही, तर ती दायित्वशून्यताही आहे. सरकारी धोरणावर विधायक टीका करण्याची अनुमती आहे; परंतु घटनात्मक पदावर असलेल्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही’ – न्यायमूर्तींचे निरीक्षण

राहुल गांधी यांनी त्यांच्या शिक्षेला दिलेली आव्हान याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली

‘मोदी आडनाव असणारे सर्व जण चोर असतात’, असे विधान केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

विवाहपूर्वी नोकरी करणार्‍या महिलेने घटस्फोटानंतर पतीकडून पूर्ण पोषणाचा खर्च मागू नये ! – कर्नाटक उच्च न्यायालय

विवाहापूर्वी नोकरी करणारी महिला घटस्फोट घेतल्यानंतर काम न करता बेरोजगार म्हणून घरी बसू शकत नाही आणि पतीकडून पूर्ण पोटगीही मागू शकत नाही. तिने तिचा चरितार्थ चालवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्यक्त केले.

हिंदु मुलीने धर्मांतर करून विवाहित अन् २ मुले असलेल्या मुसलमान व्यक्तीशी केला निकाह !

मुसलमान व्यक्तीच्या सांगण्यावरून तिने ‘मी स्वत:च्या इच्छेने मुसलमान धर्म स्वीकारला आहे’, या आशयाचा ‘व्हिडिओ’ सिद्ध करून प्रसारित केला.

बेंगळुरू दंगलीतील धर्मांधाला जामीन नाकारण्‍याविषयी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा आश्‍वासक निवाडा !

आरोपीला जामीन मिळण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयात अपयश, आरोपीला जामीन देण्‍यास कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाच्‍या द्विसदस्‍सीय पिठाचा नकार, न्‍यायालयाच्‍या आश्‍वासक निवाड्यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा

उलट तपासणीत अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यास पंच सुभाष वाणी असमर्थ !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू असून ३ आणि ४ जुलै या दिवशी संशयितांच्‍या वतीने ६ अधिवक्‍त्‍यांनी पंच वाणी यांची उलटतपासणी केली.

झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील दंडात्मक कारवाईला दिली तात्कालिक स्थगिती !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकात झालेल्या एका जाहीर सभेच्या वेळी गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव हे मोदीच कसे असते ?