संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या संदेशखाली येथील हिंदु महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याच्यावर झाले आहेत. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेसला फटकारले. न्यायालयाने म्हटले, ‘हे प्रकरण बाहेर येऊन पूर्ण १८ दिवस झाले आहेत. या संपूर्ण समस्येचे मूळ असलेला एक माणूस अद्याप पसार आहे. हे धक्कादायक आहे. त्याच्यावर आरोप आहेत. त्याला पाठीशी घातले आहे कि नाही, हे आम्हाला ठाऊक नाही; परंतु हे निश्चित आहे की, तो पकडला गेलेला नाही. शाहजहानला अशा प्रकारे राज्यातून प्रोत्साहन मिळू शकत नाही.’ न्यायालयाने या वेळी बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना हिंसाचारग्रस्त संदेशखाली येथे जाण्याची अनुमती दिली.
(सौजन्य : India Today)
न्यायालयाने पुढे म्हटले की, शाहजहान याने लोकांची हानी केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्याच्यावर असणार्या आरोपांपैकी एक जरी खरा असेल, तर त्याची चौकशी करावी. तुम्ही लोकांना विनाकारण त्रास देत आहात. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो कायद्याचा अनादर करू शकत नाही. तो न्यायालयात उपस्थित होतो कि नाही ते पाहू. आम्ही त्याला शरण येण्यास सांगू.
(सौजन्य : DNAIndiaNews)
संपादकीय भूमिकायातून स्पष्ट होते की, बंगालमध्ये कायद्याचे नाही, तर जिहाद्यांचे राज्य चालू आहे ! याचाच आधार घेऊन आता केंद्र सरकारने तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी ! |