रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना हानीभरपाई देण्याचा केरळ उच्च न्यायालयाचा आदेश !

न्यायालयाने ‘एकूण ३० लाख रुपयांची रक्कम पीडितेच्या कुटुंबियांना द्यायला सांगितली. यात २० लाख रुपये संबंधित रुग्णालयाने आणि अन्य ५-५ लाख रुपये हे शस्त्रकर्म करणार्‍या दोघा आधुनिक वैद्यांनी द्यावेत’, असे सांगितले.

Shopping Complex Thiruvannamalai : तिरुवन्नमलाई येथील श्री अरुणाचलेश्‍वर मंदिरासमोर ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ बांधणार नाही !

हिंदूंचे यश ! हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी म्हटले आहे.

१ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !

सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या साहाय्याने आरोपीला पकडले. यानंतर आजी मेश्राम हिने तक्रार दिली. सबळ पुरावा न्यायालयासमोर मांडल्यानंतर आरोपीला वरील शिक्षा न्यायालयाने सुनावली.

कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !

जेथे बंदीवान सुधारण्यासाठी येतात, तेथेच जर त्यांना भ्रमणभाष आणि अन्य सुविधा देण्यात येत असतील, तर ते सुधारतील कसे ?

मालवणी (मुंबई) येथे विषारी मद्यामुळे १०६ जणांच्या मृत्यूप्रकरणी ४ जण दोषी !

वर्ष २०१५ मध्ये मालवणीमधील लक्ष्मीनगर येथे मद्य पिऊन १०६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जणांना अपंगत्व आले होते. हे मद्य विषारी असल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले होते.

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

Covishield Vaccine Side Effect : ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो !

‘कोव्हिशिल्ड’मुळे ‘थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ची लक्षणे आढळू शकतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेन स्ट्रोक येणे, प्लेटलेट्स अल्प होणे आदी गोष्टी होऊ शकतात; मात्र हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये होऊ शकते.

Dhar Bhojshala Survey : भोजशाळेविषयी सर्वेक्षणाला इंदूर उच्च न्यायालयाकडून २ महिने मुदतवाढ !

न्यायालयाने पुरातत्व विभागाला भोजशाळेच्या सर्वेक्षणाविषयी अंतिम अहवाल ४ जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे.

Kejriwal Lust For Power : केजरीवाल यांच्या अटकेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये !

केजरीवाल सत्तेच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्रीपद अजूनही सोडत नाही, हे लज्जास्पद आहे. देहलीच्या जनतेनेच आता केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्यासाठी दबाव आणला पाहिजे !

पीअर रिव्ह्यू, जी.एस्.टी. संदर्भात रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने मार्गदर्शन सत्र

सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे ? याबद्दल मार्गदर्शन केले.