‘तमिळनाडू हिंदु धर्मादाय विभागा’ची उच्च न्यायालयात माहिती !
चेन्नई – ‘तमिळनाडू हिंदु धर्मादाय विभागा’ने (एच्. आर्. अँड सी. ई.) तिरुवन्नमलाई येथील श्री अरुणाचलेश्वर मंदिराच्या राजगोपुरम्समोर ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ बांधणार नसल्याचे उच्च न्यायालयासमोर सांगितले आहे. हा मंदिराच्या भक्तांचा मोठा विजय आहे, असे मंदिर कार्यकर्ता टी.आर्. रमेश यांनी ३० एप्रिल २०२४ या दिवशी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे.
On 10.11.2023 I had brought the issue of illegal constructions of 150 shops in temple land right in front of the Rajagopuram of Sri Arunachaleswarar temple, Tiruvannamalai- an ancient and architecturally important temple – before the Hon’ble Special Bench that was hearing temple… pic.twitter.com/XHHfVBydrb
— trramesh (@trramesh) April 30, 2024
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे सूत्र न्यायालयासमोर उपस्थित केले असता, या प्रकरणाची सुनावणी करणार्या खंडपिठाने हे बांधकाम त्वरित थांबवण्याचा आदेश दिला होता.
No shopping complex to be constructed in front of Sri Arunachaleswar Temple in #Tiruvannamalai
Hindu Religious & Charitable Endowments Department (HR & CE), Government of Tamil Nadu, confirms to High Court
'This is a major victory for the devotees of the temple'
– @trramesh… pic.twitter.com/tlnNtZFh7X— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2024
याविषयी टी.आर्. रमेश यांनी ‘स्वराज्य’ या हिंदुत्वनिष्ठ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हे बांधकाम वारसास्थळाच्या सौंदर्याला हानी पोचवणारे होते.