सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे !

सनातन धर्म शाश्‍वत कर्तव्‍यांचा समूह आहे. यात देश, राजा, माता, पिता आणि गुरु यांच्‍याप्रती कर्तव्‍य, तसेच गरीबांच्‍या सेवेसमवेत अन्‍य कर्तव्‍ये यांचाही समावेश आहे. यामुळे सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे आहे, असे मत मद्रास उच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्‍यक्‍त केले.

मथुरेतील बांकेबिहारी मंदिराची मुसलमानांनी लाटलेली भूमी परत घेण्याचा उच्च न्यायालयाचा प्रशासनाला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन ही भूमी स्वतःहून कह्यात का घेत नाही ?

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या शिक्षेच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्यास लाहोर उच्च न्यायालयाचा नकार  

लाहोर उच्च न्यायालयाने क्रांतीकारक भगतसिंह यांना वर्ष १९३१ मध्ये दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करावी, अशी मागण्यात असलेली याचिका फेटाळून लावली. वर्ष २०१३ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याची ‘कर्मचारी’ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते ! – उच्च न्यायालय

वंशपरंपरागत विश्‍वस्त किंवा विश्‍वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याला मंदिरात कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते; मात्र त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी विश्‍वस्तपदावरील दावा सोडावा लागेल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

देशहिताला प्राधान्‍य देणारा प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘प्रयागराज उच्‍च न्‍यायालयाने धर्मांध इनामूल हक उपाख्‍य इनामूल इम्‍तियाज याला नुकताच जामीन नाकारला.

सरकारचे साक्षी-पुरावे संपल्‍याची सीबीआयची माहिती !

महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्‍या हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने साक्षी पुरावे संपल्‍याचा अर्ज सादर केला आहे. त्‍यामुळे संशयितांचे म्‍हणणे (जबाब) नोंदवले जाणार असून त्‍यानंतर बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येतील.

राज्‍यातील जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये तब्‍बल ५० लाख ७३ सहस्र खटले प्रलंबित !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून माहितीचा अधिकार (आर्.टी.आय.) कायद्यांतर्गत प्राप्‍त झालेल्‍या माहितीनुसार ३१ जुलै २०२३ पर्यंत राज्‍यातील जिल्‍हा न्‍यायालयांमध्‍ये ५० लाख ७३ सहस्र ७२६ प्रकरणे प्रलंबित आहेत.

आतंकवादाच्‍या विरोधात जम्‍मू-काश्‍मीर उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

सैनिकांवर दगडफेक आणि ‘लष्‍कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्‍याप्रकरणी महंमद युनूस मीर याच्‍याविरुद्ध जम्‍मू-काश्‍मीरच्‍या बुडगाम जिल्‍हाधिकार्‍यांनी स्‍थानबद्धता करण्‍याचे आदेश दिले.

पुणे येथील लोकअदालतीमध्‍ये १ लाखांहून अधिक दावे निकालात !

९ सप्‍टेंबर या दिवशी झालेल्‍या लोकअदालतीमध्‍ये १ लाख १० सहस्र १९२ प्रलंबित दावे निकालात काढले. त्‍यातून ३९६ कोटी २ लाख ९९ सहस्र २०० रुपयांचे तडजोड शुल्‍कही प्राप्‍त झाले आहे.

मुलांना उपाहारागृहातून मागवलेल्या जेवणापेक्षा घरी बनवलेले जेवण द्या ! – केरळ उच्च न्यायालय

मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.