१ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – एक दिवसाच्या बाळाच्या हत्या प्रकरणात विद्यमान जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख यांनी हत्येच्या प्रकरणारत आरोपी गिरीश गोंडाणे याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

३१ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ६ ते ७ वेळेत आरोपी गिरीश हा मेडिकल रुग्णालयातील प्रभाग क्रमांक ४६ येथे गेला. त्या वेळी नवजात बाळ आईच्या कुशीत झोपले होते. आरोपीने आई प्रतीक्षा गोंडाणेच्या कुशीतून एक दिवसाच्या बाळाला उचलून हवेत फिरवून फरशीवर आपटले. त्या वेळी बाळाची आजी जीवनकला मेश्राम आणि सुरक्षा गार्ड उत्तरा द्विवेदी प्रत्यक्ष उपस्थित होत्या.

सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या साहाय्याने आरोपीला पकडले. यानंतर आजी मेश्राम हिने तक्रार दिली. सबळ पुरावा न्यायालयासमोर मांडल्यानंतर आरोपीला वरील शिक्षा न्यायालयाने सुनावली.