Jitendra Tyagi Acquitted : कुराणाच्या कथित अवमानाच्या प्रकरणातून जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांची निर्दोष सुटका !

जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हरिद्वार धर्म संसदेत कुराणाचा कथित अपमान केल्याच्या प्रकरणात हरिद्वार न्यायालयाने जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांची निर्दोष मुक्तता केली. जितेंद्र नारायण त्यागी हे उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला होता.

१. खरखडी येथील निकेतन आश्रमात धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या भाषणांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित करून मुसलमानांनी ‘जितेंद्र त्यागी यांनी द्वेषपूर्ण भाषण केले’, असा आरोप केला होता.

२. नदीम अली याने डिसेंबर २०२१ मध्ये या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. या प्रकरणी ९ जणांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता.

३. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ (वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे) आणि कलम २९८ (प्रार्थनास्थळाचा अपमान करणे) या कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

४. याच प्रकरणी डासना पीठाचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती आणि ‘सूरदर्शन न्यूज’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावरही एफ्.आय.आर्. प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती.

५. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी हरिद्वार न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अविनाश श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने ‘जितेंद्र त्यागी यांना संशयाचा फायदा (बॅनिफीट ऑफ डाऊटच्या) आधारे निर्दाेष मुक्त करत असल्याचे सांगितले.

६. जानेवारी २०२२ मध्ये जितेंद्र त्यागी यांना अटकही करण्यात आली होती. त्यांना मे २०२२ मध्ये जामीन मिळाला होता.