श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने वर्ष २०१२ – १३ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ६-७ फूट उंचीची श्री सरस्वतीदेवीची मूर्ती भेट दिली होती; मात्र ज्या भावाने शिक्षकाने ही मूर्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भेट दिली, त्या भावाने शिक्षण विभागाच्या वतीने त्याचे पावित्र्य राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

श्रीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शिक्षक अब्दुल वहिद याला अटक

पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

शासकीय कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी

या संपात प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर शाळेला सुट्टी असल्याचा फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता.

२ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक !

जिल्‍ह्यातील सिंदखेडराजा तालुक्‍यात ३ मार्च या दिवशी इयत्ता १२ वी परीक्षेच्‍या पेपरफुटीची घटना घडली होती. या प्रकरणी येथील पोलिसांनी २ शिक्षकांसह ५ आरोपींना अटक केली आहे.

ठाणे येथे अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या मदरशातील शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; परंतु तो पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे. १४ वर्षांच्या मुलाने धडे नीट लक्षात न ठेवल्यामुळे शिक्षकाने मारहाण केली.

भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

अशा प्रकारे जर हिंदु शिक्षकांनी वर्गात भगवद्गीता शिकवली असती, तर तथाकथित नास्तिकतावाद्यांनी ‘शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण होत आहे’, अशी आरोळी ठोकली असती !

व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

‘टी.ई.टी.’ अपव्यवहार प्रकरणातील सुपे यांचे ६५ लाखांचे दागिने परत करण्याचे आदेश !

शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अपव्यवहार प्रकरणातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ सहस्र ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सुपे कुटुंबियांना परत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.जे. डोलारे यांनी दिले आहेत.

शाळेत संतश्री आसारामजी बापू यांची आरती : ५ शिक्षकांचे स्थानांतर

शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली.

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.