व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

अमेरिकेच्या फ्लोरिडामधील शाळेतील घटना !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील फ्लोरिडामधील मातांजास शाळेतील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षिकेला अमानुष मारहाण केली. ती भूमीवर पडल्यावर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी स्थानिक लोकांनी विद्यार्थ्याला रोखल्याने शिक्षिकेचे प्राण वाचले.

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

संपादकीय भूमिका

पुढे भारतात अशा घटना घडल्यास आश्‍चर्य वाटू नये ! अशा घटना घडण्यापूर्वीच भारतातील विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार आणि साधना शिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !