कर्णावती (गुजरात) – महिसागर जिल्ह्यातील लुणावाडा तहसील क्षेत्रातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीसह संतश्री आसारामजी बापू यांची आरती केल्याने ५ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले. यामध्ये ३ शिक्षक, तर २ शिक्षिका यांचा समावेश आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव आणण्यात आला होता. त्यावर गुजरातचे शालेय शिक्षणमंत्री कुबेर सिंह डिंडोर यांनी उत्तरदायींवर कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते.