ठाणे येथे अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या मदरशातील शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

७० सेकंदांत ७० फटके दिले

मदरशातील प्रतिकात्मक चित्र

ठाणे – येथील मदरशात एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पुष्कळ मारहाण करण्यात आली. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. मदरशातील शिक्षक फहाद भगत नूरी (वय ३२ वर्षे) याने विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली. ७० सेकंदांत त्याला ७० फटके मारण्यात आले.

त्यामुळे मुलगा घायाळ झाला. या प्रकरणी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; परंतु तो पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे. १४ वर्षांच्या मुलाने धडे नीट लक्षात न ठेवल्यामुळे शिक्षकाने मारहाण केली. ही घटना २४ नोव्हेंबर २०२२ या दिवशीची आहे; पण त्याविषयीचा व्हिडिओ आता प्रसारित होत आहे.

संपादकीय भूमिका

एरव्ही निधर्मीवादाचा उदोउदो करणार्‍या वृत्तवाहिन्या अशा विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करत नाहीत, हे लक्षात घ्या !