श्रीनगरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी शिक्षक अब्दुल वहिद याला अटक

शिकवणी (ट्यूशन) शिक्षक अब्दुल वहिद याला ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एका ९ वर्षांच्या मुलीवर शिकवणी (ट्यूशन) शिक्षक अब्दुल वहिद याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अब्दुल वहिदच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

फेब्रुवारी २०२३ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेर येथेही लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला होता. येथील सरकारी शाळेतील शिक्षक महंमद ताज नियाझी याच्यावर दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला निलंबित करून अटक करण्यात आली होती. एवढेच नाही, तर सप्टेंबर २०२२ मध्ये दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेचा प्राचार्य महंमद मकबूल गनी याला दोन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

वासनांध धर्मांध !