भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

भोपाळ – येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारीला ही घटना घडली. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे सर्वांना ठाऊक आहे; परंतु कुणी काहीही बोलत नाही, अशी माहिती अन्य काही शिक्षकांनी दिली. तथापि या शाळेचे मुख्याध्यापक के.डी. श्रीवास्तव यांना याविषयी विचारले असता त्यांनी, ‘याविषयी मला काहीही ठाऊक नाही आणि असा प्रकार मी कधीही शाळेत पाहिला नाही’, असे उत्तर दिले.

 शाळेला नोटीस पाठवणार ! – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग

वर्गात धार्मिक कार्य करणे, हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. असे होत असेल, तर आम्ही याची नोंद घेऊन संबंधित शाळांना नोटीस पाठवू,

अशी प्रतिकिया राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी व्यक्त केली.

(सौजन्य : Republic Bharat)  

संपादकीय भूमिका

  • वर्गात श्री सरस्वतीदेवीचे पूजन न चालणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित नास्तिकतावादी, साम्यवादी आता याविषयी काहीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशा प्रकारे जर हिंदु शिक्षकांनी वर्गात भगवद्गीता शिकवली असती, तर तथाकथित नास्तिकतावाद्यांनी ‘शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण होत आहे’, अशी आरोळी ठोकली असती !