६० दिवसांत ३०८ कोटी रुपयांचा मिळकत कर वसूल !

कर संकलनासाठी शहरात १७ प्रभाग आहेत. यामध्ये वाकड प्रभागमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९ सहस्र ७५९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे; तर पिंपरी नगर प्रभागमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० सहस्र १९ मालमत्ताधारकांनी भरला आहे.

वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) आयुक्तांसह तिघांना सातारा जिल्हाधिकार्‍यांची नोटीस !

गुजरात येथील वस्तू आणि सेवा कर आयुक्त आणि त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी या गावातील ६२० एकर भूमी कवडीमोल भावाने ग्रामस्थांकडून विकत घेतली व ४० एकर जागेत अनधिकृत ‘रिसॉर्ट’ बांधले.

संपादकीय : राजकारण्यांचीच संपत्ती जप्त करा !

भ्रष्टाचारी राजकारण्यांची संपत्ती जप्त झाली, तर देशाच्या विकासाला पैसै अल्प पडणार नाहीत; कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशांपेक्षा हे पैसे साहजिकच अधिक असणार आहेत; मात्र अशी मागणी एकही राजकीय पक्ष मान्य करणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

InheritanceTax in India : भारतात अमेरिकेप्रमाणे वारसा कर लावण्यावर चर्चा व्हावी ! – सॅम पित्रोदा

भारताच्या इतिहासात अशा प्रकारचा कायदा कधीच नव्हता आणि कधीच होऊ शकणार नाही. जर कायदा करायचाच असेल, तर तो राजकारण्यांसाठी करावा, असेच भारतीय जनता सांगेल !

Service Tax On Yoga Shibirs : योगऋषी रामदेवबाबा यांना योग शिबिरासाठी भरावा लागणार ‘सेवा कर’ ! – सर्वोच्च न्यायालय

योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे दिले कारण !

५७ कोटी रुपयांचा कर बुडवल्याच्या प्रकरणी पुणे येथील मद्य बनवणार्‍या आस्थापनाच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

सुकेतू तळेकर आणि प्रतीक चतुर्वेदी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राज्य कर निरीक्षक दीपक शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात ७ सहस्र ४६३ कोटींचा कर जमा !

बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.

४२ कोटी रुपये वसुलीसाठी महापालिकेकडून १ सहस्र ५०० गाळेधारकांसाठी जप्ती मोहीम चालू !

‘आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ दिवस बाकी असतांना महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील १ सहस्र ५०० गाळेधारकांकडील ४२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कर विभागाने जप्ती मोहीम चालू केली आहे.

IT Notice To INC : आयकर विभागाकडून काँग्रेसला १ सहस्र ७०० कोटींची नोटीस !

लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

Tax Free Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गोव्यात करमुक्त करा !

हा चित्रपट विद्यार्थीवर्गापासून प्रौढांपर्यंत सर्वांनीच पहावा, असाच आहे. त्यामुळे हा चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.