Goa IT Raids : गोव्यातील कर बुडवणार्‍या औषधनिर्मिती आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांवर आयकर खात्याच्या धाडी

वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.

कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव चालू !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागाने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया चालू केली आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची सूची वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली आहे. टाळे ठोकलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

पुणे शहरातील मिळकतदारांकडे ५ सहस्र १८२ कोटी रुपयांची थकबाकी !

‘कर भरणे हे कर्तव्य आहे’, हे आजपर्यंतच्या सरकारने किंवा प्रशासनाने नागरिकांना शिकवलेच नाही, त्याचा हा परिणाम !

काँग्रेसला सत्तेवर बसवल्याचे दुष्परिणाम जाणा !

कर्नाटक सरकारने नुकतेच संमत केलेल्या विधेयकानुसार हिंदु मंदिराचा महसूल १ कोटी रुपये असेल, तर सरकार त्यावर १० टक्के कर आकारू शकते. तसेच या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये इतर धर्मातील सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

IT Raids Goa : गोव्यात आयकर विभागाच्या पब, हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांवर धाडी

समुद्रकिनारी भागांतील हॉटेल, पब, रेस्टॉरंट यांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. ही आस्थापने आयकर चुकवण्याची शक्यता असल्याच्या संशयावरून आयकर विभागाने या धाडी घातल्या आहेत.

राष्ट्रघातकी करबुडवेगिरी !

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले.

गोव्यात गेल्या ४ वर्षांत व्यावसायिकांनी १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ बुडवला

राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे येथे मालमत्ता कराच्या वसुलीसाठी १५ शाळांच्या इमारती ‘सील’; २५ सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी !

विद्यार्थ्यांच्या हानीचे दायित्व कुणाकडे ? अशा प्रकारे कर थकित ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

छत्रपती संभाजीनगर येथे प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्‍यांच्या ११ ठिकाणी धाडी !

प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्‍यांनी ३० नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजता शहरातील बांधकाम क्षेत्रातील ११ मोठ्या व्यावसायिकांची कार्यालये आणि निवासस्थाने येथे धाड घातली. सर्व ठिकाणी एकाच वेळी धाड घालण्यात आली.