मुलांनी हातात पिस्तुल घेऊन गोळीबार करणे हा पालकांनी त्यांच्यावर वेळीच योग्य संस्कार न केल्याचा परिणाम होय !
पुणे – भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळतांना गंमत (चेष्टा) केली; म्हणून नीलेशने (वय २१ वर्षे) रागात गावठी पिस्तुलातून करण गजरमलच्या (वय १९ वर्षे) खांद्यावर गोळी झाडली. त्यात करण घायाळ झाला. या प्रकरणी करणने मित्र नीलेशच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (गावठी पिस्तुल बाळगणे हा गुन्हा आहे. याची जाणीव असूनही पिस्तुल बाळगणे म्हणजे पोलिसांची दहशत अल्प झाल्याचे लक्षण ! – संपादक)
संपादकीय भूमिकाचेष्टा केली म्हणून स्वतःच्या मित्रावर गोळीबार करणार्या मुलांना आपण काय करतो, याचे भान नसणे हे गंभीर आहे. |