तिघांना अटक, १ जण पसार !
पुणे – ‘ए.टी.एम्.’मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचा ‘पीन नंबर’ (पैसे काढण्याचा क्रमांक) विचारून घेऊन त्याद्वारे त्यांच्या अधिकोष खात्यातील पैसे काढून लुटणार्या आंतरराज्य टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. समून रमजान, नसरुद्दीन नन्ने खान, बादशाह इस्लाम खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत; तसेच आदील सगीर खान हा पळून गेला असल्याची माहिती मिळते. त्यांच्याकडून रोख ५० सहस्र रुपये, १४७ ए.टी.एम्. कार्ड आणि स्वीफ्ट चारचाकी गाडी असा २ लाख ५० सहस्र रुपयांचा माल जप्त केला आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रासह अमरोहा, बुलंदशहर, उत्तरप्रदेश, बिहार, देहली या ठिकाणी लूटमार केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. (कायद्याचा धाक नसल्याने गुन्हे करण्याचे धर्मांधांचे धाडस होत आहे. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)
राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना १७ जानेवारी या दिवशी एक संशयित सिल्व्हर रंगाची चारचाकी पुणे-सातारा मार्गाने कोल्हापूर येथे जाणार आहे, अशी माहिती मिळाली. गवळी यांनी खेड-शिवापूर टोलनाका येथे नाकाबंदी करून संशयितांना कह्यात घेतले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून खिशातील २ सहस्र रुपये आणि अधिकोष खात्यातून ५० सहस्र रुपये काढून घेतल्याची तक्रार माधवराज जल्लवाड यांनी केली होती.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध ! |