ISKCON Restaurant Attacked In B’desh : बांगलादेशात जिहादी मुसलमानांनी ‘इस्कॉन’चे उपाहारगृह तोडफोड करून बंद पाडले !

इस्कॉनची उपाहारगृहे हिंदुत्व विचारसरणी पसरवण्याचे केंद्र असल्यावरून आक्रमण

‘गोविंदाज किचन’ उपाहारगृहामध्ये गोमांस न दिल्याकारणाने लक्ष्य करण्यात आले !

ढाका (बांगलादेश) : ढाक्याच्या मालीबाग परिसरातील ‘गोविंदाज किचन’ या इस्कॉनच्या शाकाहारी हिंदु उपाहारगृहामध्ये जिहादी मुसलमानांनी तोडफोड करून ते बंद करण्यास भाग पाडले. ‘तौहीदी जनता’ गटाचे सदस्य म्हणून स्वतःची ओळख करून देणार्‍या जिहाद्यांनी दावा केला की, ‘गोविंदाज किचन’ उपाहारगृहामध्ये गोमांस न दिल्याकारणाने लक्ष्य करण्यात आले होते. १६ जानेवारीला ही घटना घडली. उपाहारगृह बंद झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी सामाजिक माध्यमांतून हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि पोलीस अधिकार्‍यांकडून कारवाईची मागणी केली आहे.

१. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका पोस्टमुळे भडकलेल्या जिहादी मुसलमानांनी उपाहारगृहाचे कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांवर आक्रमण केले. यात अनेक जण घायाळ झाले.

२. गोमांसाचे कारण निमित्त असून या उपाहारगृहावर आक्रमण मुख्यतः ‘पॅराडॉक्सिकल साजिद’ नावाच्या फेसबुक खात्यावरून पसरवलेल्या प्रक्षोभक पोस्टमुळे करण्यात आले.  या पोस्टमध्ये ‘इस्कॉन’कडून चालवल्या जाणार्‍या शाकाहारी उपाहारगृहांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही उपाहारगृहे हिंदुत्व विचारसरणी पसरवण्याचे केंद्र असल्याचा दावा यात करण्यात आला होता.

३. या पोस्टमध्ये लोकांना ‘इस्कॉनला उपाहारगृह चालवण्यासाठी मालमत्ता भाड्याने देऊ नये’, असे आवाहन करण्यात आले होते, तसेच इस्कॉनच्या उपाहारगृहांमध्ये त्यांच्या पाककृतींमध्ये गोमूत्र आणि शेण मिसळले जाते. या पोस्टमुळे उपाहारगृहावर आक्रमण करण्यात आले.

४. ‘गोविंदाज किचन’ हे एक लोकप्रिय उपाहारगृह होते, जे परवडणार्‍या शाकाहारी जेवणासाठी ओळखले जाते. येथील ग्राहकांमध्ये केवळ हिंदूच नाही, तर अल्प उत्पन्न गटातील मुसलमानही होते.

हिंदु उपाहारगृहे हिंदु आतंकवाद्यांना लपण्याची ठिकाणे असल्याचा दुष्प्रचार !

गोविंदाज हॉटेलवर आक्रमण करण्यासाठी वातावरण निर्माण करण्यासाठी विविध प्रक्षोभक पोस्ट पसरवण्यात आल्याचा आरोप आहे. यात ‘बांगलादेशामध्ये हिंदु उपाहारगृहांमधून कट रचले जात आहेत. या उपाहारगृहांमध्ये हिंदु आतंकवाद्यांनी  लपण्याची ठिकाणे स्थापन केली आहेत आणि ही उपाहारगृहे भारतीय गुप्तचर संस्थांच्या शाखा म्हणून काम करत आहेत’, असे म्हटले आहे.

हिंदु समर्थक मुसलमानाच्या ‘राजधानी हॉटेल’वरही आक्रमण

‘गोविंदाज किचन’वर ज्या प्रकारे आक्रमण झाले, तसेच आक्रमण ढाक्यातील ‘राजधानी हॉटेल’वरही करण्यात आले. हे उपाहारगृह मुसलमानाचे असून तो हिंदूंच्या संदर्भात सहानुभूती बाळगणारा होता आणि येथे गोमांस दिले जात नसल्याने या उपाहारगृहावर आक्रमण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

भारतात गोमांसावरून हिंदुत्वनिष्ठांनी मुसलमान कसायांना, तस्करांना विरोध केल्यावर त्यांची बाजू घेणारे निधर्मीवादी या घटनांवर गप्प का ?