वणी (यवतमाळ), १९ जानेवारी (वार्ता.) – येथील अवैध गोवंश हत्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची समिती करणार आहे. २० जानेवारी या दिवशी ही समिती चौकशी करून २४ जानेवारी या दिवशी गोसेवा आयोगाला अहवाल देणार आहे.
समितीत गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य शेगाव येथील उद्धव नेरकर, छत्रपती संभाजीनगरचे मनीष वर्मा, विधी सल्लागार म्हणून वणी येथील अधिवक्ता आतिश कटारिया, सदस्य सचिव म्हणून जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त, यवतमाळ यांचा समावेश असेल. समिती यवतमाळ जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या कामाचा आढावाही आयोगाला देणार आहे.