श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर पानिपत रणसंग्रामातील विरांना मानवंदना !

‘दीपवंदना’

पुणे – पानिपत रणसंग्रामातील वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर झालेल्या ‘दीपवंदना’ कार्यक्रमात उपस्थितांनी शेकडो दीप प्रज्वलित करून मानवंदना दिली. या वेळी इतिहासतज्ञ मोहन शेटे, सावरकरप्रेमी विद्याधर नारगोलकर, रमेश भागवत, सुधीर थोरात यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शेटे यांनी पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. ‘या युद्धामध्ये अनेक वीरांनी बलीदान दिले. विजयाची आशा असतांना पारडे फिरले आणि पराभव झाला; परंतु हा पराभव मराठ्यांना अपमानास्पद नव्हता. राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठ्यांनी कसा लढा दिला, हे जगाने अनुभवले. यानंतर भारतावर त्या दिशेने आक्रमण झाले नाही’, असे ते म्हणाले. या वेळी अभिनव कलाभारतीने रांगोळी काढली.