नाकारलेली लाभार्थी महिला जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी !
पुणे – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांना सरकारने स्वत:हून लाभ सोडण्यासाठी आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातून एका लाभार्थ्याने ‘योजनेचा लाभ नको’, म्हणून अर्ज केला. हा अर्ज केलेली संबंधित लाभार्थी महिला जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी आहे. (स्वार्थी वृत्ती ठेवून सरकारी योजनांचा अशा प्रकारे अपलाभ घेणार्या फसव्या लाभार्थ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे ! त्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)
महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील अधिकार्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये इतर योजनांचा लाभ घेणारे आणि ज्यांना ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजने’ची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘लॉगिन’ देण्याचा निर्णय देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही चालू झाली आहे.
संपादकीय भूमिका :पात्र नसतांनाही सरकारी योजनांचा आर्थिक लाभ घेणार्या सर्व लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम वसूल केली पाहिजे ! |