माशांच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्डा’चे महापालिकेला आदेश !

पुणे – मुळा-मुठा नदीपात्रात नाईक बेटाजवळ सहस्रो माशांच्या मृत्यूच्या घटनेची ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्डा’ने गंभीर नोंद घेतली आहे. माशांच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश बोर्डाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी संगमवाडीजवळील नाईक बेट परिसरात सहस्रो माशांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रातील दूषित पाण्यामुळेच मासे मृत्यूमुखी पडले, असे पर्यावरणतज्ञांचे म्हणणे होते. महापालिकेने मृत्यूमुखी माशांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले. नदीपात्रात पाणी अडवल्याने ऑक्सिजनचा पुरवठा अल्प होऊन माशांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या दाव्यानुसार नदीपात्रातील पाणी अडवल्याने डबके झाले. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा अल्प झाल्याने मृत्यू झाला. (पाणी नक्की कुणी अडवले ? याचा शोध महापालिकेने अजूनपर्यंत का घेतला नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

असे आदेश का द्यावे लागतात ? प्रशासनाला स्वतःला असे का वाटत नाही ?