काणकोण (गोवा) समुद्रकिनार्‍यावर रात्री संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवावे ! – नागरिकांची पोलिसांत तक्रार

नागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ?

सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !

सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात कधीतरी असे होईल का ?

‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती कशी दिली ? याची माहिती द्या ! – उच्च न्यायालय

२७ डिसेंबर २०२२ या दिवशी अनुज्ञप्तीसाठी अर्ज करून दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर २०२२ ला महोत्सवाला अनुज्ञप्ती ही देण्यात आली !

‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?

परीक्षाकाळात ध्‍वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांवर कारवाई करा !

सध्‍या दहावी-बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्‍यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांमुळे, तसेच अन्‍य काही लोकांकडून होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासात अडचणी येत असल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत.

ध्वनीप्रदूषणामुळे पर्यटनावर विपरित परिणाम ! – प्रदूषण नियंत्रण मंडळ

राज्यात एकूण १२ ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जाणार आहेत. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

वागातोर येथील ‘ग्लोरी क्लब’च्या विरोधात ध्वनीप्रदूषणावरून गुन्हा नोंद

हणजूण-आश्वे-वागातोर या समुद्रकिनारपट्टीवरील ‘नाईट क्लब’ आणि समुद्रकिनार्‍यावरील उपहारगृहे न्यायालयाच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करतात.

ध्वनीप्रदूषणावरून सनबर्नच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई ! – प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला दिली माहिती

न्यायालयाने फैलावर घेतल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय वृत्तीचे नव्हे, तर स्वतःहून प्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणारे तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ हवे !

हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना ३५ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्येक वेळेला या मशिदींवरील भोंग्यांवर लक्ष ठेवत रहाण्यापेक्षा मशिदींवर भोंगे लावण्याचीच अनुमती रहित करण्याची आवश्यकता आहे !

गोवा : हणजूण येथे ध्वनीप्रदूषणाविषयी एका उपाहारगृहावर कारवाई

या उपाहारगृहाच्या मालकांनी ध्वनीप्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ यांचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी उपाहारगृहातील ध्वनीक्षेपक जप्त केले आहेत. यासंबंधी पुढील अन्वेषण चालू आहे.