पणजी, ९ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा सरकारला मनोरंजन विभाग स्थापन करण्याची अनुमती घेऊन या विभागामध्ये ध्वनीप्रदूषणाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याची मागणी गोवा सरकार केंद्राकडे करणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टंमडळ देहली येथे जाऊन केंद्र सरकारची भेट घेणार आहे, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात उद्योग, व्यवसाय, निवासी विभाग आदी विविध ठिकाणी ध्वनीप्रदूषणावरून निरनिराळ्या मर्यादा आहेत.
संपादकीय भूमिकाही शिथिलता घेतांना किनारपट्टी भागात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसवणारे संगीत वाजवले जाणार नाही, हे पहावे ! |