गोवा : मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवर संगीत महोत्सव घेण्यास बंदी येणार

मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.

‘सनबर्न’सारख्या संगीत महोत्सवाला मान्यता देण्यासाठी यापुढे संयुक्त विशेष विभाग !

‘सनबर्न’ महोत्सवासाठी घाईगडबडीने अवैधरित्या संमती देण्यात आली. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची हमी राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यावर १०० तक्रारी केल्यानंतरही कारवाई न होणे, हे गोवा प्रशासनाला लज्जास्पद !

‘किनारी भागातील आस्थापनांकडून रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी जानेवारी ते मार्च मासाच्या मध्यापर्यंत पोलिसांना दूरभाषवरून दिवसाला सरासरी १०० तक्रारी केल्याचे समोर आले आहे.’

गोवा : अडीच मासांत समुद्रकिनारी भागात रात्री ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या प्रतिदिन सरासरी १०० तक्रारी

एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ?

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्‍यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !

मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?

काणकोण (गोवा) समुद्रकिनार्‍यावर रात्री संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवावे ! – नागरिकांची पोलिसांत तक्रार

नागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ?

सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !

सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात कधीतरी असे होईल का ?

‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती कशी दिली ? याची माहिती द्या ! – उच्च न्यायालय

२७ डिसेंबर २०२२ या दिवशी अनुज्ञप्तीसाठी अर्ज करून दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर २०२२ ला महोत्सवाला अनुज्ञप्ती ही देण्यात आली !

‘नाईट पार्ट्यां’मुळे अश्वे समुद्रकिनार्‍यावरील कासवांचे अस्तित्व धोक्यात !

‘पर्यावरणरक्षक’ म्हणून टेंभा मिरवणारे पुरोगामी समुद्रकिनार्‍यावर होणारे ध्वनीप्रदूषण आणि झगमगते दिवे यांमुळे कासवांवर होणार्‍या विपरित परिणामांविषयी गप्प का ?

परीक्षाकाळात ध्‍वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांवर कारवाई करा !

सध्‍या दहावी-बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्‍यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांमुळे, तसेच अन्‍य काही लोकांकडून होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासात अडचणी येत असल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत.