‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण दाखवले आहे ! – प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते

‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून समाजप्रबोधन होत नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे आणि भयानक चित्र दाखवले जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे.

पुणे येथील माहिती अधिकार सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे विशेष वृक्षसंवर्धन सामाजिक पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते पै. श्री. सोहम् बाळासाहेब शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांना विशेष वृक्षसंवर्धन सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प.पू. सत्यसाईबाबा यांनी समाजहितासाठी केलेले अतुलनीय समाजकार्य !

संत-महंत हे कोणत्याही शासकीय साहाय्यातेविना, तसेच राजकीय आणि शारीरिक स्तरांवर विरोध होत असतांना गेली कित्येक वर्षे समाजसेवा करत आहेत.

शोषित आणि वंचित यांसाठी काम करत असल्याचे भासवून प्रतिष्ठित व्यक्तीचा मुखवटा धारण करून नक्षलवाद चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक

सार्वजनिक सभा घेण्यासारखे कार्यक्रम करून शहरी नक्षलवाद करणारे स्वत:चा एक मुखवटा सिद्ध करतात. यामध्ये अधिवक्ता, आधुनिक वैद्य असू शकतील.

मानसिक आरोग्य कायद्याच्या कार्यवाहीसाठी प्राधिकरण गठित करण्याचा राज्यशासनाचा निर्णय

वाढत्या मानसिक रोगांच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१७ मध्ये बनवलेल्या मानसिक आरोग्य या कायद्याची प्रत्यक्ष कार्यवाही करतांना अडचणी येत असल्याने राज्यशासनाने मानसिक आरोग्य प्राधिकरण गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपुर्‍या पावसामुळे राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश स्थिती

मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्राचा काही भाग, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यामुळे तेथील शेती संकटात आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे.

(म्हणे) ‘चित्रपटांनी मूल्यशिक्षण द्यावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे !’ – गुलजार, गीतकार

चित्रपट म्हणजे बायबल नव्हे. त्यात तुम्हाला नैतिकता आणि चांगली मूल्ये शिकवली जाणार नाहीत. चित्रपट त्यासाठी नसतो. ‘चित्रपटांनी मूल्यशिक्षण द्यावे’, असे वाटत असेल, तर ती अपेक्षा चुकीची आहे, असे मत गीतकार गुलजार यांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक माध्यमांवर भावनिक ‘स्टेटस’ ठेवणार्‍या मुलींना लक्ष्य करून त्यांचे शोषण केले जाते ! – सर्वेक्षण

सामाजिक माध्यमांवरून भावनिक ‘स्टेटस’ला (चित्र, विचार आदींद्वारे स्वतःची प्रतिमा दर्शवणे) प्रतिसाद देणार्‍या मुलींना लक्ष्य करण्यात येते आणि त्यातून पुढे त्यांचे शोषण केले जाते, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

गुजरातमध्ये बिहारी तरुणाची हत्या

गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाच्या मूळच्या बिहारमधील तरुणावर १२ ऑक्टोबरच्या रात्री कामावरून घरी परतत असतांना अज्ञातांनी लोखंडी सळीने आक्रमण करून त्याची हत्या केली.

गुजरातमधून ५० सहस्र उत्तर भारतियांचे पलायन

१४ मासांच्या मुलीवर बिहारच्या मजुराने केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतियांच्या विरुद्ध हिंसाचार होत आहे. यामुळे गेल्या आठवड्याभरात ५० सहस्र मजूर उत्तरप्रदेश आणि बिहार येथे परतले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF