Kedarnath Ropeway : केदारनाथमध्ये ‘रोप वे’ बांधणार – केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव

९ घंट्यांचा प्रवास केवळ ३६ मिनिटांत पूर्ण होणार

(‘रोप वे’ म्हणजे म्हणजे दोरीवर लटकलेल्या वाहकांमध्ये प्रवाशांची किंवा मालवाहतुकीची वाहतूक करण्याची व्यवस्था)

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडमधील केदारनाथ धामसाठी ‘रोप वे’ प्रकल्पाला संमती देण्यात आली. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहिबमध्ये रोप वे बांधण्यालाही संमती देण्यात आली आहे. हेमकुंड साहिबमधील प्रकल्पासाठी २ सहस्र ७३० कोटी रुपये खर्च केले जातील. सोनप्रयाग ते केदारनाथ असा १२.९ किलोमीटरचा रोप वे बांधला जाईल, ज्यावर ४ सहस्र ८१ कोटी रुपये खर्च केले जातील. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाकडून ते बांधेल जाईल. याचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे सध्या ८-९ घंट्यांत पूर्ण होणारा प्रवास ३६ मिनिटांत होईल. रोप वे मध्ये एका वेळी ३६ लोक बसण्याची क्षमता असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.