शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क रहित !

मुंबई – शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क रहित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ मार्च या दिवशी घेतला.

ते म्हणाले, ‘‘शैक्षणिक कामासाठी जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (नॉन क्रीमिलेयर), तसेच शिक्षणासाठी महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील, त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. साधारणतः १० वी – १२ वी च्या निकालानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात. प्रत्येक दाखल्यासाठी ५०० रुपये याप्रमाणे ३ सहस्र रुपये व्यय येतो. या निर्णयामुळे पालकांचा व्यय वाचणार आहे.’’