Ranya Rao Gold Case : कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांच्या अभिनेत्री मुलीला सोन्याची तस्करी करतांना अटक !

दुबईहून परतल्यावर १४.८ किलो सोन्यासह पकडले !

अभिनेत्री रान्या राव

बेंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिला तब्बल १४.८ किलो सोन्याची तस्करी करतांना बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. रान्या राव ही कर्नाटकचे पोलीस महासंचालक (पोलीस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ३ मार्चच्या रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रान्या हिला अटक केली.

१. ४ मार्चच्या सायंकाळी तिला न्यायाधिशांसमोर उपस्थित केल्यानंतर तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

२. गेल्या १५ दिवसांत रान्या राव ही चार वेळा दुबईला गेल्याचे संचालनालयाला आढळून आल्यावर अधिकार्‍यांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास आरंभ केला. ती दुबईहून ‘एमिरेट्स’च्या विमानाने बेंगळुरूत उतरताच तिला विमानतळावरून कह्यात घेण्यात आले.

संपादकीय भूमिका

पोलीस महासंचालकांच्या पोटी अशी पिढी निपजणे, हे लांच्छनास्पद आहे, असे कुणी या घटनेवरून म्हटल्यास ते वावगे ठरू नये !