श्रीरामनवमीच्या दिवशी प्राण्यांची हत्या करणार्‍यांवर गुन्हा नोंद

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत प्राण्यांच्या हत्येला प्रतिबंध करणारा आदेश काढल्याचे प्रकरण

ठाणे, ११ एप्रिल (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत श्रीरामनवमीच्या दिवशी मांस विक्रेत्यांना प्राण्यांची हत्या करण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढला होता. या आदेशाचे उल्लंघन करून श्रीरामनवमीच्या दिवशी डोंबिवली परिसरातील लोढा हेवन, मलंगगड रस्त्यावरील काका ढाबा भागांत मांसविक्री करतांना काही जण आढळले. या प्रकरणी महादेव लोखंडे (दुकानमालक), ताज अली शेख, शाबान अहमद, रमजान अहमद, साजन जुहाद शेख या ५ जणांवर मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शासनाच्या आदेशाला न जुमानणार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित ! – संपादक)