आरोपी नझरूद्दीन याला अटक, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध चालू !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील शाही जामा मशिदीत अज्ञातांकडून इस्लाममध्ये निषिद्ध असणार्या प्राण्याचे मांस फेकल्याने तणाव निर्माण झाला. जेव्हा मुसलमान शुक्रवारच्या नमाजपठणासाठी मशिदीत पोचले, तेव्हा त्यांना वजू (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) येथे पॉलिथिनची एक पिशवी आढळली. त्यात हे मांस असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी मुसलमानांना शांतता राखण्याचे आवाहन केले, तसेच पोलिसांनी अवघ्या ५ घंट्यात अन्वेषण करून या प्रकरणी नझरूद्दीन नावाच्या मुसलमान व्यक्तीला अटक केली. त्याच्या समवेत आणखी किती जण या गुन्ह्यात सहभागी आहेत, याची चौकशी केली जात आहे.
🚨 Agra: Nazaruddin caught on CCTV throwing forbidden meat in Shahi Jama Masjid 🕌
Police arrested culprit after frenzied mobs gathered in protest
Is this not yet another case of fanatics themselves becoming the conspirators—deliberately inciting communal tension to target… pic.twitter.com/xngblGUvLA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 11, 2025
सध्या येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मशिदीभोवती सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्या आधारे पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. यासाठी ५ पथके बनवण्यात आली आहेत. ही घटना येथील शांतता बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका
|