त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

देवद (पनवेल), ८ एप्रिल (वार्ता.) – आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे. जीवनात संकल्पानेच सर्व कार्य होत असते. युवकांनी स्वस्थ आणि आनंदी जीवन जगायला हवे, असे मार्गदर्शन त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी केले. त्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ७ एप्रिल या दिवशी भेट दिली. या वेळी करण्यात आलेल्या त्यांच्या सन्मानप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्यासमवेत अधिवक्ता राम नाकती आणि श्री. आनंद जाधव हेही उपस्थित होते. या वेळी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक आगवेकर यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी प्रकाशित केलेले ‘धर्मशिक्षण फलक’, ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’, ‘हलाल जिहाद’ हे ग्रंथ स्वामीजींना भेट देण्यात आले.

आश्रमातील साधक श्री. पुष्कराज जोशी यांनी स्वामीजींना आश्रमात चालणार्या सर्व सेवांविषयी अवगत केले. स्वामीजींनी आश्रमातील सर्व सेवा आणि सनातन संस्थेचे कार्य याविषयी जिज्ञासेने जाणून घेतले.
आश्रम आणि साधक यांच्याविषयी स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांचे गौरवोद्गार !आश्रमातील व्यवस्था आणि नियोजन उत्तम अन् अद्भुत आहे. तुम्हाला असे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मिळाले, यासाठी तुम्ही सर्व जण भाग्यवान आहात. या साधनामार्गावर तुम्ही आला आहात. आश्रमातील स्वच्छता पाहून चांगले वाटले. |
स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा परिचय !![]() हस्तसामुद्रिक शास्त्र, वैदिक ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद या विषयांचा स्वामीजींचा अभ्यास आहे. हिंदु धर्मकार्यासाठी ते विविध राज्यांत जातात, तसेच ते युवा पिढीच्या प्रबोधनाचेही कार्य करतात. |