खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

मुंबई – राजभवनाच्या ४८ एकर भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, असे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. त्या स्मारकाच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयनराजे भोसले म्हणाले की,…
१. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक देहलीत व्हावे. मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन झाले होते. त्या वेळी मी स्वतः तिथे होतो; पण कदाचित् पर्यावरणामुळे तिथे ते स्मारक उभारता येत नसेल.
२. राजभवनाची भूमी अरबी समुद्राला लागूनच आहे. तिथे स्मारक होऊ शकते.