|
अलीगड (उत्तरप्रदेश) – आधुनिक व्यायामशाळेत (जिममध्ये) जाणार्या एका हिंदु तरुणीला २ मुलांचा वडील असलेला जिम प्रशिक्षक रझा खान याने हिंदु असल्याचे खोटेच सांगून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने ‘राजा’ हे नाव वापरून त्या हिंदु तरुणीवर बलात्कार केला आणि जेव्हा त्याची ओळख उघड झाली, तेव्हा त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणणे चालू केले. याविषयी पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून तपास चालू केला आहे.
१. पीडित तरुणीने सांगितले की, जेव्हा ती जिममध्ये जाऊ लागली, तेव्हा रझा खान तिला प्रशिक्षण देत असे. रझा खान याने त्याचे नाव ‘राजा’ असल्याचे तिला सांगितले आणि हळूहळू तिच्याशी मैत्री केली.
२. एके दिवशी त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या वेळी त्याने अश्लील व्हिडिओ बनवला.
३. जेव्हा रझा खान याची खरी ओळख उघड झाली, तेव्हा त्याने पीडितेला व्हिडिओ दाखवून धमकावण्यास चालू केले. पीडितेने धर्मांतर करून नमाजपठण चालू करावे, यासाठी रझा खान प्रयत्नशील होता.
४. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी चांगले स्थळ पाहून तिचे लग्न ठरवले. यामुळे संतापलेल्या रझा खान याने तरुणीचे लग्न होत असलेल्या ठिकाणी तिचा अश्लील व्हिडिओ पाठवला. त्यामुळे तिचा लग्न मोडले.
५. त्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु पालकांनो, धर्मांध जिहाद्यांपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विषयी त्यांचे प्रबोधन करा ! |