US-China Tariff War : अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क वाढवून १४५ टक्के केले !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने आयात शुल्कावर ९० दिवसांची स्थगिती दिली, तरी चीनला यातून सोडलेले नाही. काल चीनवरील आयात शुल्कात १२५ टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने पुन्हा यात वाढ करून ती १४५ टक्के केली.

अमेरिकेने सांगितले की, ‘ती ‘फेंटानिल’वर २० टक्के कर जोडत आहे.’ फेंटानिल हे एक अमली पदार्थ आहे. दुसरीकडे चीनने यापूर्वीच अमेरिकेवर ८४ टक्के प्रत्युत्तरात्मक शुल्क लादले आहे.