
‘एकदा किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली होती. भेटीच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. देवबाबा यांना विचारले, ‘‘आश्रमातील काही साधक तुमच्या आश्रमात काही दिवस गो-सेवेसाठी येऊ शकतात का ?’’ त्या वेळी प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘हो; पण आमचा आश्रम साधा आहे. आश्रमातील खोल्यांमध्ये वातानुकूलित यंत्रे नाहीत, तसेच विशेष सोयीसुविधाही नाहीत. त्यामुळे साधकांना आश्रमात रहातांना अडचणी येऊ शकतात.’’

हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘साधकांचे ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ हे आहे. त्यामुळे सोयीसुविधेच्या सूत्राला फारसे महत्त्व नाही.’’ त्यानंतर आश्रमातील काही साधकांचे प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात गो-सेवेला जाण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या प्रसंगानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘साधना करतांना साधकांच्या जीवनात भिन्न भिन्न परिस्थिती आणि त्यानुरूप काही अडचणी येत असतात; पण ‘साधकांचा केंद्रबिंदू नेहमी ‘साधना आणि ईश्वरप्राप्ती’ हाच असायला हवा’, ही शिकवण गुरुदेवांनी वरील प्रसंगातून दिली आहे. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचाच विचार करतात. त्यामुळे त्यांना ‘मोक्षगुरु’, असे म्हणतात.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२४)