Prayagraj Kumbh Parva 2025 : महाकुंभातील गंगानदीच्या पाण्याची प्रतिदिन होत आहे पडताळणी !
गंगेत कचरा होऊ नये; म्हणून प्रशासनाकडून वेळच्या वेळी नदीतील पाने, फुले आणि कचरा काढला जात आहे. यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिदिन वेगवेगळ्या घाटांकडील पाण्याचे परीक्षण करण्यात येत आहे. गंगेतील कचरा ‘गंगा सेवादूतां’चा चमू वेळच्या वेळी काढत आहे.