पुणे ‘पोर्शे’कार प्रकरणातील २ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट !

रक्ताच्या नमुन्यात पालट करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप !

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ५ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

एवढ्या मोठ्या प्रमाणात कह्यात घेतलेला मुद्देमाल असेल, तर न पकडण्यात आलेला किती असेल ?

हडपसर येथील ३ मजली इमारतीला भीषण आग !

आग पूर्णपणे आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली ? हे अद्याप समजू शकलेले नाही.

पुणे येथे गुटख्याची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी पकडला !

गुटखा बंदी असतांना उत्पादने सिद्ध होणे ही कायदा सुव्यवस्थेची ऐशी-तैशीच !

शरद पवार हे केवळ तालुक्याचे नेते, ‘जाणता राजा’ ही नंतरची गोष्ट ! – मनसेप्रमुख राज ठाकरे

खडकवासला मतदारसंघात मनसेचे उमेदवार मयूरेश रमेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते.

पुणे शहरात रक्ताचा तुटवडा !

सुटी आणि निवडणूक कालावधी पूर्वनियोजित असतांनाही रक्त पिशव्यांची सोय न करणारे रक्तपेढीवाले असंवेदनशीलच होत !

‘पोर्शे’ कार अपघातातील अरुणकुमार सिंह याला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

अरुणकुमारने स्वत:च्या कार्यालयातील कर्मचार्‍याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे अन्वेषणातून समोर आले.

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली अटक !

पिंपरी-चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय सायबर टोळी कार्यरत असणे, हे महाराष्ट्रासह देशासाठी धोकादायक !

जोपर्यंत देशात अखंड एकता आहे, तोपर्यंत भारताला कुणीही तोडू शकत नाही ! – माधवी लता, भाजप नेत्या

माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जाते; कारण येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच भेदभाव नाही; मात्र काही जण सरकार बनवण्याच्या नादात रावण बनत आहेत. त्यामुळे भारतातच मोगल निर्माण होत आहे.

पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

जनतेला शिस्त न लावल्यामुळे किमान ‘महापालिकेच्या आवारात तरी शिरस्त्राणसक्ती करा’, असा आदेश काढावा लागणे, हे दुर्दैवी !