सिंहगड रस्त्यावरील ‘नंबरप्लेट’ बसवणारी २ केंद्रे अचानक बंद झाल्याने वाहनधारकांना त्रास !
नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?
नागरिकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाचे दायित्व स्वीकारून प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का ?
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत…
येथील धनकवडी मधील वीर सावरकर चौकात ११ मार्च या दिवशी एका चहाच्या टपरीचे उद्घाटन होते. त्या वेळी त्या स्टॉलवर येणार्या प्रत्येकाला १ रुपयामध्ये चहा देण्यात येत होता.
मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रमोद कांबळे आणि विशाल पारखे यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख ८० सहस्र रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला आहे. पुढील अन्वेषण चालू आहे.
शहरातील आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भोंग्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? प्रत्येक वेळी पोलिसांना हे न्यायालयाला का सांगावे लागते ?
धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. धरणाच्या पाण्यात कुणी उतरू नये, तसेच पाण्याचे प्रदूषण होऊ नये यांसाठी समिती निःस्वार्थपणे हे कार्य करत आहे.
विनापरवाना मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची विक्री करणार्या दोघांना मोरे वस्ती, हडपसर येथे पोलीस पथकाने अटक केली.
शासनाने ‘सर्टिफिकेट’ची आणलेली योजना चांगली असून त्याला आमचा पाठिंबा आहे; मात्र या योजनेस ‘मल्हार’ हे नाव न देता इतर नाव द्यावे.
‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज’निमित्त ५ फूट उंच आणि ३० फुटांचा घेर असलेली पगडी दिलीप सोनिगरा यांनी तुकोबाचरणी अर्पण केली आहे. ही जगातील सर्वांत मोठी पगडी असल्याचा दावा केला जात आहे.
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी पुणे येथे गेली २२ वर्षे सातत्याने आणि यशस्वीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या वर्षीही सर्वांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे.