Abdul Hakim, Desecrated Tulsi Vrindavan : तुळशी वृंदावन अपवित्र करणार्‍या अब्दुल हकीम याच्या विरोधात कारवाई का नाही ?

  • केरळ उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्‍न !

  • पोलिसांनी मुसलमानावर कारवाई करण्याऐवजी घटनेचा केवळ व्हिडिओ प्रसारित करणार्‍या हिंदूंवरच केली कारवाई !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – हिंदूंसाठी पवित्र असलेले तुळशी वृंदावन अपवित्र केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अब्दुल हकीम याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई का केली नाही ?, असा प्रश्‍न  केरळ उच्च न्यायालयाने केला आहे. या घटनेविषयी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपाखाली श्रीराज नावाच्या व्यक्तीला जामीन संमत करतांना न्यायाधिशांनी हा प्रश्‍न विचारला. (चोर सोडून संन्याशाला शिक्षा करणारे कायदाद्रोही केरळ पोलीस ! – संपादक) न्यायाधिशांनी त्यांच्या निकालात पोलिसांना अब्दुल हकीम याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. (असा आदेश द्यावा लागतो, हे पहाता कारवाई न करणार्‍या संबंधित पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

तुळशी  वृंदावनावर अब्दुल हकीम ने गुप्तांगाचे केस टाकले

(वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

१. श्रीराजच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी व्हिडिओ प्रसारित  केल्याविषयी ३२ वर्षीय श्रीराजच्या विरोधात गुन्हा नोंद केला; परंतु ज्याने तुळशी  वृंदावनावर त्याच्या गुप्तांगाचे केस टाकण्याचे आक्षेपार्ह कृत्य केले आहे, त्या अब्दुल हकीमच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद केला नाही.

२. न्यायालयाला पोलिसांकडून सांगण्यात आले की, हे कृत्य करणारा व्यक्ती अब्दुल हकीम हा मानसिक रुग्ण आहे. (मुसलमान असणारा मानसिक रुग्ण नेहमीच हिंदूंच्या पवित्र गोष्टींचाच कसा अवमान करतो ? हिंदू मानसिक रुग्ण कधी मुसलमानांच्या पवित्रा गोष्टींचा कधी अवमान करतो का ? मुसलमान आरोपीला जाणीवपूर्वक मानसिक रुग्ण दाखवून पोलीस या घटनेची गांभीर्य अल्प करून हिंदूंची दिशाभूल करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

३. न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हिकृष्णन् यांनी मात्र या दाव्यावर शंका व्यक्त केली; कारण न्यायालयाला असेही सांगण्यात आले होते की, अब्दुल हकीम हा गुरुवर्यूर येथील एका हॉटेलचा मालक होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही होता.

४. न्यायालयाने म्हटले की, जर तो मानसिक रुग्ण आहे, तर तो हॉटेलचा मालक म्हणून कसा काम करत आहे आणि  जर तो मानसिक रुग्ण असेल, तर त्याला वाहन चालवण्याची अनुमती कशी मिळाली ? याचेही अन्वेषण अधिकार्‍यांनी केले पाहिजे, असा आदेशही दिला.

५. श्रीराज याच्यावर १२ जानेवारी २०२५ या दिवशी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप होता, ज्यामध्ये अब्दुल हकीम नावाचा एक माणूस तुळशी वृंदावनाचा अपमान करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

६. पोलिसांनी दावा केला की, हा व्हिडिओ प्रसारित करण्याचे कृत्य धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने होते आणि त्यांनी श्रीराजच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती.

७. श्रीराजने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करून जामीन देण्याची विनंती केली होती.

संपादकीय भूमिका

केरळमधील साम्यवादी आघाडी सरकार धर्मांध मुसलमान सरकारचे जावई असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागते. असे सरकार केंद्र सरकारने विसर्जित करून हिंदूंचे आणि हिंदु धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे !