भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी साहाय्य करील ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र ही संत, शूर-वीर यांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकर्‍याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणार्‍या बोगद्याचा मार्ग पालटण्यात आला आहे.

कार्यकारी अभियंत्यांसह ३ जणांना लाच घेतांना अटक

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

धर्माचरण हाच ‘लव्ह जिहाद’वर उपाय ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, पुणे

राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी पद्मावती, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांचा शौर्यशाली इतिहास आपल्याला लाभला आहे.

T. Raja Singh On Aurangjeb Tomb : औरंगजेबाची कबर अजूनही अस्तित्वात का आहे ?

औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. ही कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. आता अवघ्या देशातील हिंदू विचारत आहेत की, औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे ?

कोथरूड येथे २१ मार्चला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ !

‘आपला परिसर’ आणि ‘तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित देशभरातील संगीत महोत्सवात मानाचे स्थान प्राप्त केलेला ‘पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ या वर्षी २१ ते २३ मार्च या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.

अतिक्रमण आणि प्रदूषण यांच्या विळख्यात मुठा कालवा !

मुठा उजवा कालवा हा पुण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असून, त्याच्या आजूबाजूला वाढलेली अतिक्रमणे आणि प्रदूषण यांमुळे तो धोक्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडे अतिक्रमण हटवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असूनही कारवाई होत नाही, हे अत्यंत गंभीर आहे.

धुळवडीच्या पार्श्वभूमीवर २७२ जणांवर पोलिसांची कारवाई !

पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.

पुरातन मंदिरांचे जतन हे महत्त्वाचे कार्य ! – डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांनी केले.

सद्गुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.