कुतूबमिनारबाहेर हिंदु संघटनांनी केले हनुमान चालिसाचे पठण !

संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना केली पाहिजे.

प्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अधिवक्ता अवधेश पांडे यांचे अभिनंदन ! असा प्रयत्न प्रत्येक अधिवक्त्याने करावा !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील शारदा विश्‍वविद्यालयाच्या प्रश्‍नपत्रिकेत हिंदुत्वाची नाझीवादाशी तुलना !

शारदा विश्‍वविद्यालयामध्ये हिंदुत्वाची तुलना ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) विचारसरणीशी करण्यात आली आहे. येथे एका प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना फॅसिस्ट आणि हिंदुत्व यांची तुलना करणारा प्रश्‍न विचारण्यात आला आहे.

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत आरोलकर यांनी ही भूमिका घेतली आहे.

पतियाळा (पंजाब) येथील ‘गुरु की सराय’ या शिखांच्या धार्मिक स्थळाला मशीद बनवल्याचे मत !

हिंदूंचे म्हणणे आहे की, फाळणीपूर्वी येथे शीख कुटुंब रहात होते आणि ते या स्थानाची देखभाल करत होते. त्या कुटुंबाला मुसलमानांनी धमकावून हाकलून लावले आणि ही जागा स्वतःच्या नियंत्रणात घेतली.

जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी कीर्तन बंद पाडले !

कीर्तन बंद पाडायला हा देश भारत आहे कि पाकिस्तान ? असा प्रकार करण्याचे धाडस पोलिसांनी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी दाखवले असते का ?

हिंदूंच्या मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे कधी थांबणार ?

हिंदूंनी रामनवमी साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढल्या; पण या शोभायात्रांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये धर्मांधांकडून दगडफेक आणि शस्त्रांस्त्रांसह आक्रमणे झाली.

अलवर येथे शिवमंदिर पाडल्याच्या विरोधात भाजपच्या मोर्च्यात साधू आणि संत यांचा सहभाग !

अलवर येथील राजगडमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ३०० वर्षे जुने शिवमंदिर आणि अन्य २ मंदिरे पाडल्याच्या विरोधात भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर साधू-संतांच्या सहभागासह ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून ते चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.